माझ्याविरोधात कुबांड रचले होते, प्रस्थापितांविरोधात लढाई आणखी तीव्र होणार – सदाभाऊ खोत

ह्या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, हे लक्षात आले. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं.

    मुंबई : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे गुरुवारी पंचायत समितीच्या दौऱ्यावर सांगोला येथे असताना एक व्यक्ती सदाभाऊ ह्यांना अडवून थकीत बिलासंदर्भांत विचारू लागली. ह्यावेळी त्या व्यक्तीने सदाभाऊ यांचा ताफा अडवला खरा पण त्या व्यक्तीला सदाभाऊ खोत ह्यांनी विचारलं असता, त्या व्यक्तीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले. मात्र अदयाप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही अशी अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही.

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहा सुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे. “असं काहीतरी कुभांड रचायच आणि त्यानंतर हल्ला करायचा असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्याचं टायमिंग चुकले आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुबांड रचुन एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते ते लवकर येत नव्हते, त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ती पुन्हा पुन्हा सांगत होता. म्हणून हा हल्ला का झाला तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला” असे त्यांना चित्र महाराष्ट्रभर घालवायचं होतं.

    ह्या घटनेमागची सत्यता पडताळता डोळ्यासमोर जे आलं ते मात्र अस्वस्थ राजकीय वातावरणातून कुणीतरी केलेलं षडयंत्र असल्याचं उघड झालं. ह्या प्रकरणात सदाभाऊ खोत ह्यांनी राष्ट्रवादीच्या टोमॅटो सारख्या गालांच्या नेत्याच्या सांगण्यावरून हा हॉटेल मालक बनाव करत असल्याचं सांगत ह्या व्यक्तीच्या गुन्हयाचा पाढाच मिडिया समोर वाचला. ३/४/२०२१ रोजी लिमिटेशन ऍक्ट खाली आणखी एक गुन्हा दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे महाकाळ चा IPC  १३८ खाली गुन्हा दाखल आहे. जयहिंद पतसंस्थेचा IPC  १३८ खाली गुन्हा दाखल आहे. असे तब्बल सहा सात गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो वाळूमाफिया आहे. तो दारूविक्रेता आहे हि सगळी माहिती समोर आली.

    हा राष्ट्रवादीचा भामट्या एवढयावरच थांबला नसून त्याने सिद्धू शिंदे, रा. काळेवाडी, ता आटपाडी, जि. सांगली यांच्या बँगलोर येथील सोन्याच्या दुकानातून १४ किलो सोने चोरल्या बद्दल देखील गुन्हा नोंद आहे. म्हणूनच पोलिसांना सदाभाऊ खोत ह्यांनी विनंती केली कि ह्या व्यक्तीची कसून चौकशी करून त्याची मागील गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून त्यावर तात्काळ कारवाई करावी. परंतु पोलीस देखील गुन्हा नोंद करायला तयार नसल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या मागे कुणाचा तरी हात आहे, हे लक्षात आले. राष्ट्रवादीकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्याकडे चौकशीची मागणी करून खऱ्या सूत्रधाराचा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे सदाभाऊ पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांकडून मला धोका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं.