
कॅफे शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाडी टाकून कॅफे चालवणाऱ्याना चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात कॉफी शॉपच्या (Coffee Shop) चालकावर कारवाई करण्यात आली.
इंदिरानगर : कॅफे शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाडी टाकून कॅफे चालवणाऱ्याना चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात कॉफी शॉपच्या (Coffee Shop) चालकावर कारवाई करण्यात आली.
शहरात कॉफी शॉपचा सुळसुळाट झाला आहे. या कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करत असतात. एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपयापर्यंत शुल्क त्यासाठी आकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कॉफी शॉपमध्ये चहा किंवा कॉफीचे कुठलेही साहित्य नाही. मंगळवारी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्लॅक स्पून कॅफे, (बापू बंगल्याजवळ), टोकीयो कॅफे सेवन स्टार बिल (सराफनगर, ब्लॅक स्पून कॅफे, (वडाळा पाथर्डी रोड, सराफनगर), दक्ष ईम्पेरीया (वडाळा पाथर्डी रोड, सराफनगर) या चार कॅफे शॉपवर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी कॅफे शॉप चालवणारे अमोल लहू पिंगळे (३०, उत्तमनगर, सिडको), अनिकेत सोमनाथ आहिरे, (२१, पंडीत नगर, सिडको), विवेक प्रवीण सोनजे (२२, उंटवाडी, सिडको), दिनेश प्रभाकर जावरे (२८, रा. उत्तमनगर, सिडको) यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सागर परदेशी अधिक तपास करत आहेत.
अंधाऱ्या खोल्यात कापडी कंपार्टमेंट
पोलिसांना यावेळी कॉफी शॉपमध्ये कुठलाही परवाना आढळून आला नाही. तसेच कॉफी शॉपचा बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्यात कापडी कंपार्टमेंट बनवून पडदे लावून त्यात बसण्यासाठी खुर्ची-टेबल ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने आढळून आले.