A crime of molestation, atrocity against two people including the district president of Lokshasan

  सोलापूर : ग्रामसभेत प्रश्न मांडल्यावरून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह लोकशासन आंदोलन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव या दोघांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ही घटना घडली आहे.

  शिवीगाळ करून पिढीतेशी झोंबाझोंबी

  पीडित महिला गावात बाजार कामती कुरुल रस्त्यावरून वस्तीकडे जात असताना मोटारसायकलवर आलेल्या या दोघांनी वाटेत तिला अडवले. मारुती जाधव याने ग्रामसभेत लय आवाज करते का म्हणून शिवीगाळ करून पिढीतेशी झुंबाझोम्बी केली तर दिंडोरे यांनी काठीने मारहाण केल्याची तक्रार कामती पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

  पुढील तपास सुरू

  तपासावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कामती पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्याचेही समजते आहे. पुढील तपास सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक करीत आहेत.