A crossword of ten thousand squares! Prasanna Kambli from Ratnagiri recorded in 'Limka Book of Records'

रत्नागिरितील प्रसन्न कांबळी यांनी दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे बनवल्याबद्दल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. विक्रमवीर प्रसन्न कांबळी यांनी  तयार केलेल्या कोड्यानी दहा हजार ही संख्या गाठली आहे. गेली सत्तावीस वर्षे ते शब्दकोडी तयार करत असून रत्नागिरी जिल्ह्यालील सर्व दैनिके आणि सप्ताहिकांमधून त्यांनी रचलेली शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत(A crossword of ten thousand squares! Prasanna Kambli from Ratnagiri recorded in 'Limka Book of Records').

    रत्नागिरितील प्रसन्न कांबळी यांनी दहा हजार चौकोनांचे शब्दकोडे बनवल्याबद्दल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. विक्रमवीर प्रसन्न कांबळी यांनी  तयार केलेल्या कोड्यानी दहा हजार ही संख्या गाठली आहे. गेली सत्तावीस वर्षे ते शब्दकोडी तयार करत असून रत्नागिरी जिल्ह्यालील सर्व दैनिके आणि सप्ताहिकांमधून त्यांनी रचलेली शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत(A crossword of ten thousand squares! Prasanna Kambli from Ratnagiri recorded in ‘Limka Book of Records’).

    शासकीय अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळून हि शब्दकोडी तयार करणारे कांबळी यांनी विशिष्ट विषयावर कोडे तयार करणे (जसे गणपती), पांच मिनिटांत कोडे बनविणे एकाला एक जोडून महाशब्दकोडे होईल अशी अनेक कोडी रचणे अशा शब्दकोड्यांच्या रचनेत प्रावीण्य मिळविले आहे.

    अदयाप पर्यंत त्यांची एकूण दहा हजार शब्द कोडी पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने आपल्या शब्दकोडी तयार करण्याच्या वाटचालीबद्दल प्रसन्न कांबळी याती रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहा हजार चौकोनांचे एक भव्य शब्दकोडे तयार केल्यामळे ‘लिम्का बुक आणि इंडिया बुक मध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद करण्यात आली.

    भविष्यात प्रथम “एशिया बुक ‘ आणि नंतर ‘गिनीज बुक ‘ सर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. २५०चौकोन असलेले अतिभव्य शब्दकोडे त्यांनी तयार केले माहे. इतक्या शब्दांचे कोडे अदयाप दुसऱ्या कोणी बनविले नसल्याचा त्यांचा दावा असून आपल्या या नव्या विक्रमाची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात यावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.