दिव्यातील वादावर पडदा? खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

    कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात करा असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. डोंबिवली ब्राह्मण सभा सभागृह येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान आज दिवा येथील भाजपाचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या अशी मागणी ठरत पत्र भाजप प्रदेशाध्यक्षना पाठवलं होतं. त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर या वादावर आता पडदा पडल्याचं बोललं जात आहे.

    कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा येथील भाजपचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी पत्राद्वारे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार श्रीकांत शिंदेंच असणार आहेत. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करा असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले.

    याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत, त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे सांगितले. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद असल्याचे सांगितले.