file photo
file photo

दत्तात्रय विलास ओमासे असे मृत युुवकाचं नाव आहे. लावणीचा कार्यक्रम पाहताना तो गर्दीत खाली पडल्यामुळे चेंगरुन त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथे सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती.  शाळेच्या परिसरात लावणी कार्यक्रमांचं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. यावेळी अक्षरक्ष:  काही लोक शाळेच्या छतावर आणि झाडावर बसून लावणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मात्र, यावेळी कार्यक्रमाच्या परिसरात याच कार्यक्रमाच्या परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

    दत्तात्रय विलास ओमासे असे मृत युुवकाचं नाव आहे. लावणी कार्यक्रमावेळी काही प्रेक्षक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढले होते. यावेळी शाळेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर अनेक लोक गर्दी करुन उभे होते. लावणीचा कार्यक्रम पाहताना तो गर्दीत खाली पडल्यामुळे चेंगरुन त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन तपास सुरू आहे.