कल्याणामध्ये किरणा दुकानात आढळला हरण टोळ साप, सर्पमित्राने दिले हरणटोळ सापास जीवनदान

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्याना नजीक अतुल किरणा स्टोर मध्ये शनिवारी सकाळी गडद हिरव्या रंगाचा साप पाहून दुकानदार मनोज यांची पाचावर धारण बसली.

    कल्याण : कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्याना जवळील किरणा मालाच्या दुकानात हरण टोळ साप आढळल्याने दुकानादाराची भितीने धादंल उडाल्याची घटना शनिवारी घडली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत हरण टोळ सापास पकडून जीवनदान दिले.

    कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्याना नजीक अतुल किरणा स्टोर मध्ये शनिवारी सकाळी गडद हिरव्या रंगाचा साप पाहून दुकानदार मनोज यांची पाचावर धारण बसली. तात्काळ सर्पमित्र दत्ता बोंबे यांना काँल केला असता तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी गडद हिरव्या रंगाच्या किंचित आढळणाऱ्या निम विषारी सापास पकडून जीवनदान दिले.” वन आधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पकडलेल्या दोन बोटा एवढ्या जाड साडेतीन फूट सापास नैसर्गिक आधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.”