मित्राला वाचवलं, पाण्यातून बाहेर पडतानाच सगळं संपलं; डॉक्टरचा बुडून मृत्यू

घोळीसाठी उतरलेल्या मित्राचा पाय घसरून तो धबधब्यात पडल्याने (Youth Died in Water) त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात डॉक्टरचाही मृत्यू झाला. डॉ. किशोर नैताम (वय 46) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते.

    गडचिरोली : अंघोळीसाठी उतरलेल्या मित्राचा पाय घसरून तो धबधब्यात पडल्याने (Youth Died in Water) त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात डॉक्टरचाही मृत्यू झाला. डॉ. किशोर नैताम (वय 46) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते.

    रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने डॉ. नैताम व अन्य डॉक्टरांचे कुटुंबीय आलापल्ली येथून 13 किमी अंतरावरील तेलंगणातील गुंडेमपासून जवळच असलेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. धबधब्यातील पाणी पाहून पाण्यात उतरण्याचा मोह त्यांना आवरला नाही. दरम्यान, सोबत असलेल्या मित्राचा पाय पाण्यात घसरला. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी डॉ. किशोर नैताम पाण्यात उरतले. मित्राला जीवदान दिल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.

    डॉ. किशोर नैताम हे आल्लापली येथील रहिवासी असून, त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. त्यांच्या नवीन दवाखान्याच्या इमारतीचे बांधकामही सुरू होते. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने नैताम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती होताच आलापल्ली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.