कुत्र्याने घरासमोर घाण केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेवर कुत्रा सोडला; मारहाणही केली

कुत्र्याने घरासमोर घाण केल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या अंगावर कुत्रा (Attack by Dog) सोडला. त्यात कुत्र्याने महिलेचा चावा घेऊन तिला जखमी केले. त्यानंतर कुत्रा पाळणाऱ्या महिलेने जाब विचारणाऱ्या महिलेला लोखंडी वस्तूने मारहाण केली. ही घटना कवडे नगर, पिंपळे गुरव येथे घडली.

    पिंपरी : कुत्र्याने घरासमोर घाण केल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या अंगावर कुत्रा (Attack by Dog) सोडला. त्यात कुत्र्याने महिलेचा चावा घेऊन तिला जखमी केले. त्यानंतर कुत्रा पाळणाऱ्या महिलेने जाब विचारणाऱ्या महिलेला लोखंडी वस्तूने मारहाण केली. ही घटना कवडे नगर, पिंपळे गुरव येथे घडली.

    याप्रकरणी जखमी महिलेने कुत्रा पाळणाऱ्या महिलेच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या कुत्र्याने फिर्यादी यांच्या घरासमोर घाण केली. त्याचा फिर्यादीने जाब विचारला. त्या कारणावरून आरोपीने तिच्या कुत्र्याला फिर्यादीच्या अंगावर सोडले. कुत्र्याने फिर्यादीला चावा घेत लचका तोडून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी व लोखंडी वस्तूने मारून जखमी केले.

    ‘तुमच्या कुटुंबाला कुठल्या गुन्ह्यात अडकवेन ते बघा. तुम्हाला सोडणार नाही. मग तुम्ही माझ्या नादाला पण कधी लागणार नाही. तुमची माझ्याशी गाठ आहे.’ अशी धमकीही दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.