suicide

आलोडा येथील व्यक्तीने दारूच्या नशेत राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Varud) केली. ही घटना मंगळवार (दि.26) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

    वरूड : आलोडा येथील व्यक्तीने दारूच्या नशेत राहत्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Varud) केली. ही घटना मंगळवार (दि.26) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वानखडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन श्रीराम वानखडे (40, रा. आलोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सचिनला दारूचे व्यसन होते. तो सतत दारू पीत होता. दारूमध्ये तो घरी बडबड करत होता. पत्नी बोलली की पत्नीसोबत वाद घालत होता, घरची परिस्थिती बेताची. पत्नी व आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्याला दोन मुली असून, एक मुलगी नियती नववीत तर दुसरी उन्नती ही सातवीचे शिक्षण घेत आहे.

    घरी बेताची परिस्थिती अशातच सचिनला दारूचे व्यसन लागले. या व्यसनापायीच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला. घटनेच्या दिवशी आई व पत्नी दोघीही दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेल्या होत्या. तर दोन्ही मुली या शाळेत गेल्या होत्या. त्यामुळे सचिन हा एकटाच घरी होता. मंगळवारी सचिन दारू पिऊन घरी आला. घरी एकटाच असल्यामुळे त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. त्यानुसार, त्याने घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    काही वेळानंतर पत्नी व आई कामावरून घरी आल्यानंतर घराचे दार बंद दिसले. त्यांनी दार ठोकले. मात्र, आतून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निश्चितच काही अनुचित घटना घडली असावी, असा संशय पत्नीला आला. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना घटनास्थळावर बोलावून घेतले व जबरदस्तीने दार उघडले, तेव्हा सचिन हा लटकलेला दिसला. यावेळी पत्नीने आरडाओरड केली. या घटनेची माहिती पोलिस पाटलांनी बेनोडा शहीद पोलिस स्टेशनला दिली.