suicide

गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत (Financial Crisis) असलेल्या 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरीच गळफास (Suicide News) लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी (दि.15) उघडकीस आली.

    आष्टी शहीद : गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत (Financial Crisis) असलेल्या 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरीच गळफास (Suicide News) लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी (दि.15) उघडकीस आली. राजेंद्र भागवत सोनोने असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    आष्टी नगरपंचायतच्या हद्दीत राहणारे राजेंद्र भागवत सोनोने यांच्या आई, वडीलांचे निधन झाले. त्यांच्यावर लहान भावाची जबाबदारी असून, दोघेही कुटुंब चालविण्यास हातभार करत होते. शेतमजुरी करून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हाताला काम मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत राजेंद्र होता. शेतातील कामेही नसल्याने मजुरीचा शोध घेऊनही मजूरी मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होता.

    लहान भाऊ कामाच्या शोधात घराबाहेर पडला. घरी झोपून असलेला राजेंद्र हा मी पण कामावर जातो, म्हणून घरी तयारी करीत होता. दरम्यान त्याने काम शोधून आजही मिळणार नसल्याची समज करून टोकाचा निर्णय घेत राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.