संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

रानडुक्करापासून सरंक्षण होण्यासाठी एका शेतकऱ्याने विद्युत तारेत वीज प्रवाह सोडला. परंतु, त्याच वीज तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. प्रल्हाद आत्माराम मस्के (वय 77, रा. धामक, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    अमरावती : रानडुक्करापासून सरंक्षण होण्यासाठी एका शेतकऱ्याने विद्युत तारेत वीज प्रवाह सोडला. परंतु, त्याच वीज तारेला स्पर्श होऊन (Electric Shock) शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. प्रल्हाद आत्माराम मस्के (वय 77, रा. धामक, ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना तळेगाव दशासर स्थित धामक येथे बुधवारी (दि.29) उघडकीस आली.

    प्रल्हाद मस्के यांचे धामक परिसरात शेतशिवार असून, ते शेती करायचे. परंतु रानडुक्करे शेती पिके उद्ध्वस्त करत असल्यामुळे त्यांनी पिकांना सरंक्षण देण्यासाठी शेतातील बांबू काठीने लोखंडी तार गुंडाळून ठेवले आणि त्यात विद्युत प्रवाह सोडला. परंतु, लोखंडी तारातील विद्युत प्रवाहाचा जबर धक्का प्रल्हाद मस्के यांना बसला आणि ते जागीच मरण पावले.

    दरम्यान, या घटनेची माहिती त्यांचा मुलगा सोपान प्रल्हाद मस्के (वय 30, रा. धामक, नांदगाव खंडेश्वर) यांनी 29 नोव्हेंबर रोजी तळेगाव दशासर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा नोंदविला. पुढील तपास तळेगाव दशासर पोलिस करत आहे.