प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

विजेच्या कडकडाटासह जोरदार झालेल्या पावसामुळे (Rain in Varad) वीज अंगावर पडून गुरुवारी (दि.21) दुपारी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुधीर गुलाबराव बिडकर (34, रा. धनोडी) असे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

    वरुड : विजेच्या कडकडाटासह जोरदार झालेल्या पावसामुळे (Rain in Varad) वीज अंगावर पडून गुरुवारी (दि.21) दुपारी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुधीर गुलाबराव बिडकर (34, रा. धनोडी) असे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे पिके जगविण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर होते. अशातच गुरुवारी दुपारपासून विजेच्या कडकडाटासह तालुक्यातील काही भागात पावसाने जोरदार सुरुवात केली.

    शेतात काम करणारा प्रत्येकजण विजेच्या कडकडाटात जीव वाचविण्यासाठी धडपड होता. धनोडी शेत शिवारात सुधीर यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. एक मजूर महिला किरकोळ जखमी झाली. तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मृतक सुधीर बिडकर याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले, आई वडील व लहान भाऊ आहे.

    पाच लाखांची आर्थिक मदत द्या

    शेतीमध्ये परिश्रम घेऊन शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. यामध्ये कधी मृत्यूला कवटाळावे लागेल याचा नेम नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करून पाच लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.