महिला पोलिसाने पुरुषाच्या कानाखाली लगावली, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार; नेमकं काय घडलं?

एका महिला पोलिसाने एका पुरुषाच्या कानाखाली लावली. जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

    नागपूर : एका महिला पोलिसाने एका पुरुषाच्या कानाखाली लावली. जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला. संबंधित व्यक्तीने ‘बॅड टच’ केल्याने महिला पोलिसाने कानाखाली लगावल्याचे सांगण्यात येते.

    दुपारच्या सुमारास एका पक्षाचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आले. मोठा पोलिस बंदोबस्तही होता. यात महिला पोलिसांचाही समावेश होता.

    नेमकं काय घडलं? 

    शिष्टमंडळात अनेक जण होते. यातीलच एकाने महिला पोलिसाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे ती चांगलीच संतापली. तिने संबंधित व्यक्तीच्या कानफटात लगावली. यामुळे गोंधळ उडून इतर पोलिस धावले. काही वेळाने प्रकरण शांत झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या बाहेरच हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते.

    सीसीटीव्ही कॅमेराही तपासला

    मिळालेल्या माहितीनुसार, सदर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येऊन सीसीटीव्ही कॅमेराही तपासला. परंतु या संदर्भात कारवाई झाली नसल्याचे समजते. सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी घटनेला दुजोरा दिला.