अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील ICU मध्ये लागली आग

या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये 2 मुलं किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर तातडीनं मुलांना दुसऱ्या वार्डमध्ये शिफ् करण्यात आलं.

    अमरावती अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 2 मुलं किरकोळ जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा स्त्री रुग्णालयाील लहान मुलांच्या आयसीयू कक्षात आज सकाळच्या सुमारास आग लागली. यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये 2 मुलं किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर तातडीनं मुलांना दुसऱ्या वार्डमध्ये शिफ् करण्यात आलं.