कल्याणमधील वाणिज्य इमारतीच्या मेडिकलला लागली आग, नागरीकांमध्ये गोंधळाची परिस्थित

    कल्याण : कल्याणमधील ललित मेडिकल या दुकानाच्या गोडाऊनमध्ये शा’र्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे धुर पसरला. ही वाणिज्य इमारत आहे. त्यामुळे नागरीकांची पळापळ झाली. मेडिकलमध्ये अडकलेल्या दुकानदाराला काही नागरीकांनी धाडस दाखवित बाहेर काढले.

    कल्याण पश्चिमेतील साई विहार ही इमारत आहे. ही वाणिज्य इमारत आहे. शासकीय कार्यालये हा’टेल्स मेडिकल इलेट्रा’निक्सची दुकाने आहे. या इमारतीत असलेल्या ललित मेडिकल या दुकानाच्या आतमध्ये धूर निघत असल्याचे काही नागरीकांनी पाहिले. लोकांना आधी असे वाटले की, मेडिकलच्या मागे कोणी तरी कचरा जाळला असेल. परंतू थोड्या वेळात सर्वत्र धूर पसरला. धूर इतका जास्त होता की, लोकांना काही दिसत नव्हते. मेडिकलमध्ये आग लागल्याची माहिती कळताच प्रतिक दाते नावाचा एक व्यक्ती काही लोकांच्या सहाय्याने मेडिकलमध्ये घुसला. मेडिकलमध्ये धूर असल्याने काही दिसत नव्हते. अचानक मेडिकल चालकाचा हात प्रतिकला लागला. कसे बसे मेडिकल चालकास प्रतिकने मेडिकल चालकास बाहेर काढले. त्यामुळे मेडिकल चालकाचा जीव वाचला. तोपर्यंत धूर आणि आग आजूबाजूला पसरली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बँक कर्मचाऱ्यांना फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. फायर ब्रिगेडने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. नंतर लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.