डोंबिवलीत सोसायटीच्या प्लेझोनमध्ये खेळताना पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

    डोंबिवली : डोंबिवली (DOMBIVALI) मानपाडा परिसरात एका हाय प्रोफाईल सोसायटीतील प्ले झोन मध्ये खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मानपाडा परिसरातील रीजन्सी अनंतम या हाय प्रोफाईल सोसायटीत ही घटना घडली. सक्षम उंडे असे या मुलाचं नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय .

    डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा परिसरात रीजन्सी अनंत या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना सक्षम हा पाच वर्षाचा मुलगा आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला खेळत असताना तो अचानक खाली पडला. तेथील कामगारांचे सक्षम कडे लक्ष गेल्याने त्यांनी सक्षमला तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.