पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; कंपनी फोडून ६ लाखांचा ऐवज चोरला

पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रामटेकडीत कंपनी फोडत ६ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात किरण जाधव (वय ३८, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

    पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रामटेकडीत कंपनी फोडत ६ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात किरण जाधव (वय ३८, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत हारको ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनी आहे. तक्रारदार हे कंपनीत मॅनेजर आहेत. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या वायडिंग रूमच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला.

    तसेच, कॉपर स्ट्राप, कॉपर वायर असा एकूण ५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपुर्वी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.