
पुण्यात (Pune) घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चोरट्यांनी बंद मोबाईल (Mobile) शॉपी फोडून तब्बल १८ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : पुण्यात (Pune) घरफोड्यांचा धुमाकूळ सुरूच असून, चोरट्यांनी बंद मोबाईल (Mobile) शॉपी फोडून तब्बल १८ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी शॉपीतून १८ मोबाईल, लॅपटॉप व ६ लाखांची रोकड चोरून नेली आहे. याघटनेने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यासोबत विश्रांतवाडी व विश्रामबाग परिसरात घरफोड्या झाल्या आहेत.
याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात रितेश श्याम नवले (वय (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला असून, चोरी रविवारी मध्यरात्री झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे एमजी रस्त्यावरील कराची स्वीटजवळ पावित इंटरप्रायझेस नावाची मोबाईल शॉपी आहे. रविवारी ते नेहमीप्रमाणे रात्री आठच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते. यादरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी शॉपीचे शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आहे. तसेच, आतील १८ मोबाईल, लॅपटॉप व ६ लाखांची रोकड चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळता लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.
चोरीची दुसरी घटना विश्रांतवाडी परिसरात घडली असून, नवीन बांधकाम साईटवरून चोरट्यांनी तब्बल सव्वा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी साहित्य चोरून नेले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी संजय निकम (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. तिसरी घटना शनिवार पेठेत घडली आहे. चोरट्यांनी एम.जी.भावे अँड असोसिएट्स ऑफिस फोडले आहे. चोरट्यांनी ड्रायव्हरमधील ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात
मोठ्या घरफोड्यांचा तपास नाहीच…
शहरात मोठ्या घरफोड्यांचा तपासच नसल्याचे वास्तव आहे. यापुर्वी देखील समर्थ तसेच वारजेत भिंतीला भगदाड पाडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात दररोज दोन ते तीन घरफोड्या होत आहेत. परंतु, या घटनांमधील चोरट्यांचा अद्याप माग काढता आलेला नाही.