Baramati youth killed over love affair in Bibwewadi; A case has been registered against the girl's husband and minor accomplices

  पुणे : फुरसुंगी गावातील उरूसात मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम गोविंद गायकवाड, (वय २०), नितीन धोंडीराम मोरे (वय २२,रा. फुरसूंगी), अनिरुद्ध महादेव मोरे (वय २०), आकाश रामहरी हाजगुडे (वय २०) यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

  खंडोबा माळ फुरसुंगी परिसरातील घटना

  पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत १७ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी खंडोबा माळ फुरसुंगी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाने मानलेल्या बहिणीची आरोपीपैकी एकाने फुरसुंगी गावातील उरुसामध्ये छेड काढली होती. त्यावेळी तरुण आणि आरोपींमध्ये वादावादी झाली होती.

  तरुणावर धारधार शस्त्राने वार

  दरम्यान, तरुण त्याच्या मित्रासोबत दोन दिवसांपूर्वी (दि. १२ मार्च) खंडोबा माळ रेल्वे गेट याठिकाणी चहा पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी पुर्वी झालेल्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश गिते करीत आहेत.

  कोयत्याच्या धाकाने गल्ल्यातील रोकड लुटली
  दारु पिण्यास पैसे न दिल्याने कोयत्याच्या धाकाने दुकानातील दोन हजारांची रोकड लुटल्याची घटना विश्रांतवाडीत घडली.  पोलिसांनी याप्रकरणी आदित्य लोखंडे (वय २०, रा. सर्वे नं.112 विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी, रामनिवास देवासी (वय २४, रा.कळस विश्रांतवाडी) यांनी तक्रार दिली आहे. विश्रांतवाडी परिसरात देवासी याचे सरस्वती एंन्टरप्रायझेस नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास आदित्य तेथे आला. त्याने देवासीकडे दारु पिण्यास पैसे मागितले. त्याला देवासी याने नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील २ हजार रुपयांची रोकड लुटली.

  गाडीचा धक्का लागल्याने गाडीच फोडली
  चारचाकीचा दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद झाल्यानंतर दुचाकी चालकाने रस्त्यावरील ब्लॉकने तसेच बांबूने चारचाकी गाडी फोडल्याची घटना घडली. गाडी फोडल्यानंतर त्याने चारचाकीच्या चालकाला बेदम मारहाण केली. नवी पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात दयानंद जगताप (वय ४१, रा.हिंगणे खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार स्वप्निल फाले (२७, रा. दत्तवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनूसार दयानंद हे चाचाकी घेऊन नवी पेठेतून जात होते. तेव्हा त्यांच्या कारचा धक्का समोरून निघालेले फाले यांच्या दुचाकीला लागला. धक्का लागल्यानंतर त्यांनी माफी मागीतली, मात्र फाले याने रागाच्या भरात रस्त्याच्या कडेचा सिमेंट ब्लॉक उचलून कारच्या काचेवर मारला. यानंतर बांबू घेऊन बोनेटवर मारले. तसेच, त्यांना देखील गाडीतून बाहेर काढत हाताने मारहाण केली.