
कल्याण : नागरीकांसाठी तयार करण्यात आलेल्या ओपन जीम, महापलिकेची उद्याने यावर आत्ता नशेखोर तरुणांनी ताबा घेतला आहे. परिस्थिती अशी की, रात्रभर तरुणांच्या टोळक्यांचा धिंगाणा सुरु असतो. संध्याकाळी महिला मुले वॉकिंग करु शकत नाही. रात्री नागरीक घराबाहेर पडू शकत नाही. नागरीक आत्ता परिसर सोडण्याच्या तयारीत आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात नागरीक हैराण आहे. पोलिस ठोस कारवाई करीत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. परिस्थितीत दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे.
कल्याण पूर्वेतील अनेक असे परिसर आहे. ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस दारुड्यांच्या पार्ट्या, गांजा पिणारे काही ठिकाणी जमतात. कल्याणच्या खडेगोळवली परिसर, १०० फूटी रोड अशा ठिकाणी ही टोळकी ठाण मांडून बसतात. धक्कादायक म्हणजे विजयनगर परिसरातील गार्डन आहे. नागरीकांकरीता ओपन जीम आहे. संध्याकाळी महिला मुलांना घेऊन गार्डनमध्ये वॉकिंग करण्यासाठी निघायचे. ओपन जिममध्ये नागरीक व्यायाम करीत होते. मात्र काही दिवसापासून परिस्थिती बदलली आहे. रात्र होताच या परिसरात तरुणांच्या टोळक्याने व्याप्त असतो. जोरदारात आवाज करणे, शिव्या देणे, दारुच्या बाटल्या कुठेही फेकणे, मारहाण करणे, स्वत: आपसात भिडणे सुरु झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, महिलांनी संध्याकाळी घराबाहेर पडणे बंद केले आहे. नागरीकांच्या मते पोलिस येतात. बाईकवर फिरतात. निघून जातात. प्रभावी पणे पोलिसांची गस्त घातली जात नाही. ठोस कारावाई केली जात नाही. या गोष्टीपासून आम्हाला सुटकारा पाहीजे, यासाठी पोलिस काय कारवाई करता. हे पाहावे लागेल. कारण की कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर नागरीकांनी यापूर्वी मोर्चा काढला होता. परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. तरी आशा करु या की, लवकरात लवकर पोलिस नशेखोरांच्या मुसक्या बांधतील. त्याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.