दरोड्याच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी जेरबंद

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या एका कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गजाआड केले असून त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  नाशिक : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या एका कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गजाआड केले असून त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  रमेश देवाजी पवार, वय २७, धंदा शेती, रा. मु. मोकपाडा, पो. अलंगुण, ता. सुरगाणा, जि. नाशिक, वसंत सिताराम पवार, ३७, धंदा शेती, रा. मु. मोकपाडा, पो. अलंगुण, ता. सुरगाणा, जि. नाशिक, चालक संपत राजाराम मुढा, ३२, धंदा चालक, रा. मु.पो. अलंगुण, ता. सुरगाणा, जि. नाशिक, जयप्रकाश पंढरीनाथ मेहेर, ५७, चंदा मजुरी, मुळ रा. मु.पो. सातपाड़ी, ता. पालघर, जिल्हा पालघर हल्ली रा. घर नं. ६६३, शांती नगर बस्टॅन्डचे मागे सुरगाणा, ता. सुरगाणा जि. नाशिक, लक्ष्मण मधुकर कोल्हे, ३८, धंदा शेती, रा. वडपाडा ता. सुरगाणा, जि. नाशिक, कमलाकर सुरेश गांगुर्डे, ३०, धंदा शेली, रा. मु.पो. वडपाडा, ता. सुरगाणा, जि. नाशिक, शिवदत्त सोमनाथ विश्वकर्मा, ३२, धंदा शेती, रा. मु. पो. सुरगाणा कॉलेजरोड सरकारी दवाखान्याजवळ, ता. सुरगाणा, जि. नाशिक अशी संशयित सात जणांची नावे आहेत.

  या कारवाईचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या टोळीचा म्होरक्या रमेश पवार याने गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना बनावट सोने आणि पैशांचा पाऊस पाडण्याच्या थापा मारून मोठ्या रकमांना फसवल्याची चर्चा आहे. त्याच्या अटकेचे वृत्त समजताच अनेकांनी समाधान व्यक्त करून जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना धन्यवाद दिले. या सातही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक मयूर भामरे, स.पो.उप. निरी. शिरोळे, पोलीस हवालदार अहिरे, पोलीस हवालदार खराटे, पोलीस हवालदार सानप, पो. शि. बागुल यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात ही टोळी जेरबंद झाली आहे.

  वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरु असतांना नेहमीप्रमाणे गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवणे तसेच अवैध्य धंदयाची माहिती काढणे आदी कर्तव्य बजावत असतांना पोलीस निरिक्षक हेमंत पाटील यांनी पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांना गोपनीय माहिती दिली. सापुताऱ्या कडुन वणीकडे दोन तीन गुजरात पासिंगच्या चारचाकी वाहनातून ५ ते ७ संशयित येत असून त्यांच्या हालचालीवरून दरोडा किंवा तत्सम गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत ते असल्याचा संशय आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर चारचाकी वाहनांचा शोध घेण्यासाठी गस्त सुरु असतानाच या पथकाने सापळा लावला.

  दरम्यान खिराड गावाकडे जाणा-या फाट्यावर रस्त्याच्या कडेला संबंधित वर्णनाच्या तीन चारचाकी गाड्या अंधारात संशयीतरित्या उभ्या असलेल्या दिसल्या. गुप्त माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतर चालक रमेश देवाजी पवार, वसंत सिताराम पवार, चालक संपत राजाराम मुढा, जयप्रकाश पंढरीनाथ मेहेर, लक्ष्मण मधुकर कोल्हे, चालक कमलाकर सुरेश गांगुर्डे, या सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली.

  टोळीचा मुख्य सूत्रधार जयप्रकाश मेहर हा धातूला सोनेरी रंग देऊन खरं सोन असल्याचे भासवून लाखो रुपयांची फसवणूक करीत असल्याची कबुली त्याने दिली आहे. या कारवाईत वणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी विशेष कौशल्य दाखवले.

  हस्तगत मुद्देमाल:

  जीजे 19 ए ए-5976 आणि जिजे-30-ए बी-2864 क्रमांकाच्या दोन तवेरा तसेच जिजे-21-ए ए-1989 क्रमांकाची स्कोर्पिओ या तीन चार चाकी, सोबत GJ-05-CG-5138 या एकाच नंबरच्या दोन सारख्या तर MH-25 A1-2893 क्रमांकाची नंबर प्लेट, DONNA कंपनीचे तीन स्प्रे GJ-21-AA-1989 ,रोख ३,१८, ६३६ रुपये १३ मोबाईल हॅन्डसेट, ३ चारचाकी वाहन, दरोड्याच्या वेळी वापरले जाऊ शकतील अशा तीन फुटाच्या लोखंडी टॉमी,स्क्रू ड्रायव्हर,

  बनावट सोने

  गोल्ड फाईन 999 ब्रँडचे 100 ग्रॅम वजनाचे 9 सोनेरी बिस्कीट, 100Z GOLD 999.9 ब्रँडचे 50 ग्रॅम वजनाचे 30, महालक्ष्मी व गणपतीचा शिक्का असलेले 5 ग्रॅम वजनाचे 150 सोनेरी नाणी, कुबेराचा शिक्का असलेले 600 सोनेरी नाणी, राणी चित्राचे 20 ग्रॅम वजनाचे सोनेरी 08 बिस्कीट तसेच राणीचे चित्राचे 30 ग्रॅम वजनाचे सोनेरी 08 बिस्कीट असा एकूण १२ लाख ७९ हजार ८६० रुपये किमतीचा ऐवज या संशयितांच्या झडतीतून मिळून आला आहे. या सातही जणांविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात भादवी कलम 399,34 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक सचिन पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे सपोनि स्वप्नील राजपूत हे करीत आहेत.

  एलसीबीच्या पथकाकडून टोळीचा पर्दाफाश

  प्रथम दर्शनी दरोडा टाकणे हा या टोळीचा उद्देश त्यांच्याकडे सापडलेल्या मुद्देमालावरून स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडे मिळालेली लाखोंची रक्कम गुजरात मध्ये टाकलेल्या दरोड्यातील असल्याची कबुली दिली असली तरी, सोनेरी रंगाची धातुची बिस्किटे, देवदेवतांचे शिक्के असलेले धातूपासून तयार केलेले सोन्यासारखी दिसणारी नाणी ज्यांची बाजारात नगण्य किंमत मिळू शकते, ते बाळगण्याचा उद्देश काय असू शकतो? दरोड्याशिवाय सोन्याच्या नावाखाली धातूचे नाणे देऊन लोकांना लाखोंना गंडा घालण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या शिवाय आदिवासी भागात पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून लुटण्याचेही प्रकार घडत असल्याचा संशय आहे. या प्रकारांशी या टोळीचा काही संबंध आहे का? याचीही चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणात अशिक्षित अडाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर बळी पडत असतांना सुशिक्षित, उच्चपदस्थही अशा भूलथापांना बळी पडत असल्याचे आश्चर्यकारक चित्र आहे. असे अमिष दाखवले जात असेल तर बळी न पडता पोलिसांशी संपर्क साधा. असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.