A gang preparing to rob a petrol pump is in full swing; Seized by thieves
A gang preparing to rob a petrol pump is in full swing; Seized by thieves

    पुणे : कात्रज भागात पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून कोयते जप्त केले असून, ओंकार उर्फ बाब्या संतोष पवार (वय २१, रा. मानाजीनगर, नऱ्हे), रोहित काशीनाथ धोंगडे उर्फ डी (वय२१, रा. महालिला निवास, कात्रज), रोहन विठ्ठल रणदिवे (वय १९, रा. त्रिमूर्ती हाईट्स, गुजरवाडी, कात्रज), संकेत संजय हटकर (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

    याबाबत पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी-पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक निरीक्षक विश्वास भाबड यांनी ही कारवाई केली.

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक कात्रज भागात गस्त घालत होते. यावेळी किनारा हॉटेल  रिसरात एका पेट्रोल पंपावर चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.

    पोलिसांनी सापळा लावून वार, धोंगडे, रणदिवे हटकर यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चोरट्यांकडून कोयते, मिरची पावडर, दोरी असा मुद्देमाल जप्त केला आहे.