पोलीस असल्याचे भासवून २ करोड लुटणाऱ्या टोळीला २४ तासात अटक

आरोपीकडे सखोल व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता अटक आरोपीतांपैकी एक आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे चालक म्हणुन नोकरी करीत होता.

    नवी मुंबई : राजेश नारायणदास काटरा हे घाटकोपरमधील रहिवाशी असून ते व्यवसायिक आहेत. काटरा हे नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये काही कामानिमित्त जात असताना वाशी ब्रिज खालुन पामबीचकडे जाणाऱ्या सव्हीस रोडवर सेक्टर १७, वाशी, येथे आले होते. राजेश काटरा यांच्या गाडीच्या पाठीमागे व पुढे दोन वाहने आडवे लावुन त्यातील अनोळखी ६ इसमांनी काटरा यांना ते मुंबई पोलीस असल्याचे सांगून काटरा यांना तुमच्या कडे पैशांचा साठा असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असुन त्यामध्ये काटरा व काटरा यांच्या कुटुंबियांना अडकवण्याची धमकी दिली. जर त्यातून वाचायचे असल्यास २ कोटी रुपये मागुन धमकी व शिवीगाळी करून त्यांच्या गाडीतून त्रीश्ला को. ऑप. सोसायटी, प्लॉट नं. ८२, सेक्टर २९, वाशी, येथे घेवुन जावुन व काटरा यांना धमकावुन त्यांच्या जवळून २ कोटी रक्कम घेतली. याबाबत काटरा यांनी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. याबाबत वाशी पोलीस आणि गुन्हेशाखेने समांतर तपास करून त्या ६ आरोपीना २४ तासात अटक केली असून त्यात ठाणे ग्रामीण पोलीस मध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांचा समवेश आहे.

    सदरच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींनी कोणताही धागा-दोरा मागे न ठेवता सराईत पणे केलेला गुन्हा असल्याने सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वाशी पोलीस ठाणे स्तरावर ०३ वेगवेगळे पथक व गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्याकडील ०४ वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकाने आरोपीची ओळख पटवण्यासाठी त्यांचा घटनास्थळापासुन सीसीटीव्ही कॅमेराद्व्यारे व तांत्रिक तपासद्व्यारे मागोवा घेतला असता सदरचा गुन्हा हा सहा इसमांनी केल्याचे दिसुन आले होते. आरोपींची ओळख पटवुन त्यांच्या घराच्या परिसरात सापळे लावुन मोहन शिवराम पाडळे वय ४७ वर्षे, राहणार कोपरखैरने, उदय साहेबराव कवळे वय ४२ वर्षे, राहणार विक्रोळी मुंबई, विलास दत्ताराम मोहीते ५० वर्षे, राहणार राजावडी, घाटकोपर, नारायण उर्फ सागर भागवत सावंत वय ३५ वर्षे, राहणार विक्रोळी, मुंबई, नितीन भिकाजी विजयकर वय ५५ वर्षे, राहणार भांडुप मुंबई, मोहन भानुदास पवार वय ३५ वर्ष, राहणार कोपरखैरने, यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

    आरोपीकडे सखोल व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता अटक आरोपीतांपैकी एक आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे चालक म्हणुन नोकरी करीत होता. त्यास कामावरून काढल्याचा राग मनात धरून त्यांनी फिर्यादी यांचे व्यवसाय व कुंटबा बाबत इंतभुत माहीती इतर आरोपीना दिली. त्यांनतर सर्व आरोपी एकत्रित येऊन जे कृत करायचे आहे त्याबाबत आराखडा बनवुन त्याद्व्यारे फिर्यादी यांच्या राहते घरापासुन पाठलाग करून वाशी येथील घटनास्थळी मोटार वाहन आडवे लावुन मुंबई पोलीस असल्याचे सांगुन फिर्यादी यांच्याकडे पैशांचा साठा आहे अशा अनेक तक्रारी येत असुन त्यामध्ये फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबियांना अडकवण्याची धमकी देऊन त्यातुन वाचवण्याकरीता २ कोटी रक्कम मागितले व त्यांना धमकी व शिवीगाळी करून त्यांचे वाहनांमधून मुद्देमाल घेऊन जाऊन त्यांचेकडुन २ कोटी रोख रक्कम घेऊन पळुन गेले.

    अटक आरोपीतांपैकी एक आरोपी हा ठाणे ग्रामीण आस्थापनेवर पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असुन त्याची नेमणुक सुरक्षा शाखा येथे आहे. सदर गुन्हयात सहा आरोपी अटक करण्यात आलेले असुन त्यांना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयने त्यांना दिनांक ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पवन नादे सहायक निरीक्षक हे करीत आहेत.