
गाडीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला धक्का देऊन खाली पाडत त्याच्याकडील १४ लाख रुपये लुटून घेऊन जाणाऱ्या चार आरोपींना आठ दिवसानंतर वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरी : गाडीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला धक्का देऊन खाली पाडत त्याच्याकडील १४ लाख रुपये लुटून घेऊन जाणाऱ्या चार आरोपींना आठ दिवसानंतर वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुहास नवनाथ जोगदंड (वय २२, रा.पिंपरी), आदित्य संतोष घायतडक (वय २१, रा.पिंपरी), अमन आजिम शेख (वय २०, रा.पिंपरी), गणेश भंगाकांबळे (वय २१, रा.काळेवाडी) अशी अटक आरोपींचा नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी (वय ६२ रा. काळेवाडी) हे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुकानातील १४ लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी तेजवाणी यांच्या दुचाकीला धक्का दिला. यात तेजवाणी खाली पडले यावेळी आरोपींनीत्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली.
११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजपाहण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दुचाकीवरून फिरताना दिसत होते. पोलिसांनी त्यांची माहिती काढली असता ते सुहास व आदित्य असल्याचीमाहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडी परीसरातून दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांना अटक करताच त्यांचे साथीदार अमन व गणेश हे त्यांचा फोन बंद करून फरार झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्यादोघानांही ताब्यात घेतले. चारही आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या रकमेतून १० लाख ४० हजार रुपये व दुचाकी असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यातील अमन व गणेश हे सांगवी, निगडी येथील तीन गुन्ह्यात फरार होते. तर यापूर्वी गणेश याच्यावर १० गुन्हे, अमन वर 3 व आदित्य वर 1 गुन्हा दाखल होता. आरोपींना हा गुन्हा कट रचून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्यावरील कलमात ही वाढ करण्यात आली आहे.
हि कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीसनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीसहवालदार संदीप गवारी, स्वप्नील खेतले, दिपक साबळे, आतिश जाधव, प्रमोद कदम, वंदु गिरे, पोलीस नाईक प्रशांत गिलबिले, अतिकशेख, विक्रांत चव्हाण, राम तळपे, पोलिस शिपाई विनायक घारगे,रमेश खेडकर, सागर पंडित यांनी केली.