लग्नानंतर अवघ्या 18 दिवसांत ‘बबली’ फरार; अडीच लाखांसह सोन्याचे दागिने घेऊन तरूण शेतकऱ्याची फसवणूक

तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यातील 'बबली'च्या नातेवाईकांना अडीच लाख रुपये व सोन्याचे दागिने देत थाटामाटात लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या 18 दिवसांत 'बबली'ने मावशी आजारी पडल्याचे कारण देत पळ काढला. त्यानंतर पुन्हा सासरी नांदण्यास 'बबली' आलीच नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सबंधित तरुण शेतकऱ्याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिली.

    चांदवड : तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यातील ‘बबली’च्या नातेवाईकांना अडीच लाख रुपये व सोन्याचे दागिने देत थाटामाटात लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या 18 दिवसांत ‘बबली’ने मावशी आजारी पडल्याचे कारण देत पळ काढला. त्यानंतर पुन्हा सासरी नांदण्यास ‘बबली’ आलीच (Fake Marriage) नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सबंधित तरुण शेतकऱ्याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिली.

    या फिर्यादीवरून फरार बबलीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. चौघा आरोपींना चांदवड न्यायालयात नेले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.७) पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली.

    ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ अस म्हणत तरुणींनी विवाहासाठी नोकरदार व्यावसायिक तरूणांना पसंती दिली आहे. त्यामुळे शेतकरी पुत्रांचे लग्न जुळणे अवघड झाले आहे. आपलेही लग्न व्हावे यासाठी चांदवड तालुक्यातील एका 32 वर्षीय शेतकरी तरुणाने पुरी येथील एका व्यक्तीला लग्नासाठी तरुणी शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार मध्यस्ती व्यक्तीने नांदेडला एक पाहुणी राहते. तिने अनेक लग्न जमविल्याचे सांगितले. त्यासाठी तिला अडीच लाख रुपयाचे ठरवले.

    बंट्याने बबलीची बहीण अश्विनी पाटील, मावशी संगीता यांना फोन लावले. मात्र, बबली पुन्हा नांदण्यास आलीच नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे बंट्याच्या लक्षात आले. योगायोगाने गुरुवार (दि.३) रोजी चांदवडला बबली, तिची बहीण व मावशी संगीता हे फिरताना आढळून आले. त्यांना चांदवड पोलिसांनी शिताफीने पकडून वडनेरभैरव पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.