
वीट भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील १९ वर्षीय युवतीचा (मुळ गाव वागजी, जि. लातूर, सध्या रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) हिचा बलात्कार करून खून केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी दोन तासातच आरोपीचा शोध घेवून ताब्यात घेतले आहे. आरोपी सनी कांबळे याने खुनाची कबुली दिली अाहे.
पेठ वडगाव : वीट भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील १९ वर्षीय युवतीचा (मुळ गाव वागजी, जि. लातूर, सध्या रा. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) हिचा बलात्कार करून खून केल्याची घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी दोन तासातच आरोपीचा शोध घेवून ताब्यात घेतले आहे. आरोपी सनी कांबळे याने खुनाची कबुली दिली अाहे.
वाठार तर्फ वडगाव (ता.हातकणंगले) येथे लातूर जिल्ह्यातून एक कुटूंब वीट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करीत अाहे. पीडित मुलगी वाठार तर्फ वडगाव येथील एका चप्पल दुकानात काम करत होती. या मुलीला गेल्या दोन वर्षापासून वाठार येथील सनी कांबळे हा पाठलाग करून त्रास देत होता. त्याला मुलीच्या कुटुंबाने देवू नको, अशी समज दिली होती, तरीही तो तिला त्रास देतच होता.
दरम्यान दि. ९ रोजी रात्रीच्या सुमारास मुलगी कामावरून घरी येत असताना वाठार येथील दत्त मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पृथ्वी हायस्कूल जवळील ओढ्यालगत तिला अडवून शेतात नेवून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत दत्त मंदिर येथील ओढ्यात झुडुपात टाकले.
घटनास्थळी डीवायएसपी रोहिणी साळुंके, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर व पोलीस अधिकारी यांनी माहिती घेतली. घटनास्थळी मुलीचे वडील खंडू आडगळे यांना बोलावले असता कपडे व वस्तूंवरून मुलगीची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन सीपीआर रुग्णालयात करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास वडगाव पोलिस करत आहेत.
ओढ्यात मुलीचा मृतदेड अाढळला
मुलगी घरी न आल्याने तिचे वडील पाच-सहा दिवसापासून शोध घेत होते. दरम्यान रविवारी रात्रीपासून मृतदेहाची दुर्गंधी येवू लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पहिले असता ओढ्यात मुलीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. याची माहिती वडगाव पोलिसांना देण्यात आली.