
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून मिरवणुकीला सुरुवात झाली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळचे यंदाचे १३१ वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून मिरवणुकीला सुरुवात झाली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली आहे.
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून हनुमान रथातून श्रीं च्या आगमन मिरवणुकीला श्री हनुमानाच्या ४ मूर्ती असलेल्या फुलांच्या रथातून सुरवात झाली आहे. या मिरवणुकीचे दृश्य टिपण्यासाठी हजारो पुणेकर भाविकांचे मोबाईल सरसावाल्याचे पाहण्यास मिळाले.
ही मिरवणुक मुख्य मंदिरपासून अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपाकडे मार्गस्थ झाली आहे.
ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग
देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी 12 पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.