स्वराज्य भूमी कोकण महोत्सवात कोकणचा इतिहास, संस्कृती, परंपरांचे व लोककलेचे भव्य प्रदर्शन

कोकणातील दोनशे लोककलाकार एकाच ठिकाणी भव्य व्यासपीठ, कोकणचा भव्य सांस्कृतिक महोत्सव दक्षिण भारताप्रमाणेच कोकणामध्ये प्रचंड सांस्कृतिक, कोकणाच्या विविध गावांमध्ये अनेक रूढी परंपरा लोककला यांचे जतन केले आहे.

    मुंबई : स्वराज्य भूमी कोकण अभियानाला (Swarajya Bhoomi Kokan Abhiyaan) माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी त्यांचे पाठबळ दिले असून 6 ते 9 डिसेंबर रोजी गोरेगाव नेस्को कॉम्प्लेक्स (Goregaon Nesco Complex) येथे सुरू असलेल्या या भव्य कार्यक्रमाला (Kokan Mohotsav) लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

    कोकणातील दोनशे लोककलाकार एकाच ठिकाणी भव्य व्यासपीठ, कोकणचा भव्य सांस्कृतिक महोत्सव दक्षिण भारताप्रमाणेच कोकणामध्ये प्रचंड सांस्कृतिक, कोकणाच्या विविध गावांमध्ये अनेक रूढी परंपरा लोककला यांचे जतन केले आहे. कोकणात अनेक गावागावांमध्ये परंपरा संस्कृतीचे जतन केले जाते जाखडी, नमन,नकटा, शंकासुर, दशावतार ,पालखी नृत्य, कोळी नृत्याचे विविध प्रकार, शिमदोत्सव, पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे चित्रकथी ह्या मोहोत्सवात आनंद घेता येईल.

    स्वराज्य भूमी कोकण महोत्सवात कोकणातील बऱ्याच पारंपरिक गोष्टीची म्हणजेच अभिनय, नाट्य, कीर्तन, डबलबारी भजने, जाकडी, दशावतार, चालीरीती, सण-उत्सव परंपरा यांचे प्रतिबिंब असणाऱ्या कोकणची समृद्ध लोकसंस्कृतीची अनुभूती घेण्यासाठी पिढ्यानपिढ्या रुजलेली नानाविध रुचकर सागाची खेळीनी , स्वादिष्ठ पदार्थ म्हणजेच पापड, लोणची, कोकणी मसाले, आंबोली, आणि बऱ्याच खाद्य संस्कृतीचा मनमुराद आनंद घेता येईल. त्याच बरोबर कोकणतील लोकांच्या हाथकला, रेखाचित्रे, हस्तकला, ह्यांचा देखील आस्वाद घेता येईल.

    देशात सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रात मिळते, आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक उत्पन्न कोकण आणि मुंबईतुन मिळते. एवढच नाही तर ज्यांना कोकणातील आपल्या जमिनीचा विकास करायचा आहे तेथे पर्यटन, मत्स्य उद्योग, फळ प्रक्रिया, आधुनिक शेती ,बागायती , वायनरी उद्योग वेगवेगळे प्रकल्प उभारायचे आहेत अशा तरुणांसाठी स्वराज्य भूमी कोकण मोहोत्सवत मध्ये संपूर्ण माहिती मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था उभारली आहोत.

    या महोत्सवाच्या निमित्ताने स्वराज्यभूमी कोकण हा ब्रँड लाँच करण्यात आला. स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात विविध विषयांवरील ६ परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील ७५ उद्योजकांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. ६ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवासाठी एक लाख अभ्यागत येतील, अशी अपेक्षा आहे. कोकणावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संजय यादवराव यांनी केले आहे.