कल्याणमध्ये राम नवमी निमित्त भव्य मिरवणूक

मिरवणुकीत तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. लहान मुलं, तरुण, तरुणी श्रीराम, सीता, हनुमानाच्या वेशात सहभागी झाले होते. शेकडो तरुण, महिला भगवे फेटे परिधान करत बाईक रॅली मध्ये सहभागी झाले होते.

कल्याण : राम नवमी (Ram Navami) उत्सवानिमित्त आज कल्याण (Kalyan) मध्ये भव्य मिरवणूक (Grand Procession) काढण्यात आली. सहजीवन सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव फडके, राम नवमी शोभायात्रा प्रमुख विक्की गणात्रा आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला, लाल चौकी, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौक, टिळक चौक मार्गे पारनाका येथील राम मंदिरात याची सांगता करण्यात आली.

या मिरवणुकीत भाजप , शिवसेना, ठाकरे गट, मनसेसह इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी रॅलीत सहभाग घेतला होता.

मिरवणुकीत तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. लहान मुलं, तरुण, तरुणी श्रीराम, सीता, हनुमानाच्या वेशात सहभागी झाले होते. शेकडो तरुण, महिला भगवे फेटे परिधान करत बाईक रॅली मध्ये सहभागी झाले होते. राम नामाच्या जयघोषाने कल्याण दुमदुमले होते.