
सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील विहिरीत एक तरुणाचा शिर धडावेगळे असलेला मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारातील विहिरीत एक तरुणाचा शिर धडावेगळे असलेला मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तर मृतदेहाची अवघ्या अर्ध्या तासात ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, मृतदेह कुजलेला अवस्थेत असल्याने शिर पाण्यात गळून पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अविनाश उर्फ बंटी दगडू तडवी (वय 18, रा. कवली, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे बहुलखेडा शिवारातील सुरेश परमाणे यांच्या शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगताना आढळून आला. याप्रकरणी कवली गावचे पोलीस पाटील निवृत्ती केंडे आणि बहुलखेड्याचे पोलिस पाटील चंद्रसिंग राठोड यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई केली. दरम्यान, मृताचे धडावेगळे शिर असल्याने बहुलखेडा, कवली गावात खळबळ उडाली आहे.
शिर विहिरींच्या तळाशी गळून पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत अविनाश याने त्यामुळे पोलिसांनी अविनाशच्या नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली होती. तर कुटुंबातील सदस्यांना ओळख १ मेपासून तो घरातून निघून गेलेला होता. मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थित जागेवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक मेपासून घरातून निघून गेला होता…
अविनाश याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे परीक्षेच्या निकालाकडे त्याचे लक्ष होते. मात्र १ में रोजी अविनाश घरातून निघून गेला होता. तेव्हापासून नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडून त्याचा शोध घेतला जात होता.