पोलिसांना समोर पाहताच हृद्यविकाराचा झटका; पुण्यातील अमली पदार्थ तस्कराचा मृत्यू

नाना पेठेमध्ये देखील अमली पदार्थ तस्कर करणाऱ्याचा सुगावा पोलिसांना लागला. मात्र तस्करच्या घरी छापा मारण्यासाठी पोलीस आल्यानंतर त्या व्यक्तीला हृद्य विकाराचा झटका आला.

    पुणे : पुणे शहरामध्ये अमली पदार्थ तस्कर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली आहे. दरम्यान, नाना पेठेमध्ये देखील अमली पदार्थ तस्कर करणाऱ्याचा सुगावा पोलिसांना लागला. मात्र तस्करच्या घरी छापा मारण्यासाठी पोलीस आल्यानंतर त्या व्यक्तीला हृद्य विकाराचा झटका आला.

    पुण्यातील नाना पेठेतील एका अमली पदार्थ विक्रेत्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलीस दारावर आल्याचे पाहून अमली पदार्थ विक्रेता जागेवर कोसळला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तज्ज्ञांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले आहे.

    नाना पेठेतील अमली पदार्थ तस्कर करणाऱ्याच्या घरी पोलिसांचे दाखल झाले. त्यावेळी अमली पदार्थ विक्रेता दारावर पोलीस आल्याचे पाहताच कोसळला. ५२ वर्षीय बेशुद्धावस्थेतील अमली पदार्थ विक्रेत्याला रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची ‌झडती घेतली. तेव्हा घरातून काही ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.