A historic victory in the state level kickboxing competition, winning 43 medals and finished third

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ३४ जिल्ह्यातून १४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत गोंदिया जिल्ह्यातील खेळाडूंनी १६ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक व १८ कांस्य पदक प्राप्त करून गोंदिया जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला.

    आमगाव : राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याच्या खेळाडूंनी ऐतिहासिक विजय मिळवून संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा नाव पंचक्रोशीत गाजविले आहे. तलावाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या नावावर तब्बल ४३ पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या या क्रीडा कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ३४ जिल्ह्यातून १४०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या सर्व जिल्ह्यांना मागे टाकत गोंदिया जिल्ह्यातील खेळाडूंनी १६ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक व १८ कांस्य पदक प्राप्त करून गोंदिया जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला.

    यात मुकेश शेंडे, कोमल रहिले, विश्वास चव्हाण यांनी रेफ्री डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक हेमंत चावके, संगम बावनकर, सागर बावनकर व काजल मोरध्वज यांना दिले. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन विनायक अंजनकर, गुड्डू आलोत, डॉ. अवधूत मुंजे, महेश उके, नरेंद्र कावळे, रामेंद्र बावनकर, विशाल ठाकूर, सिक्का, निलेश फुलबांधे, प्रेरणा हेमने, मिथिलेश यादव, अजित सव्वालाखे यांनी केले.