
बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
बीड : बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. लातूरहून परभणीकडे जाणारी ही बस परळी शहरात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली आणि यावेळी बसचे टायर फुटले आणि बसला भीषण आग लागली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच पुढील अनर्थ टळला आहे.
बसमधील प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आलं. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.
धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. वायरचे स्पार्किंग आणि टायर फुटल्याने आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. हा थरारक प्रकार परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.