संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

भाऊबिजेच्या दिवशी खुटवड नगरला रात्री घराच्या गॅलरीत रॉकेट पडल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात भाऊबिजेला (Bhaubeej Festival) आलेल्या बहिणीचे कपडे, लॅपटॉप तसेच दिवाळी सणाचे नवीन कपडे व घरगुती साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

    सिडको : भाऊबिजेच्या दिवशी खुटवड नगरला रात्री घराच्या गॅलरीत रॉकेट पडल्याने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात भाऊबिजेला (Bhaubeej Festival) आलेल्या बहिणीचे कपडे, लॅपटॉप तसेच दिवाळी सणाचे नवीन कपडे व घरगुती साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

    खुटवड नगर पोलीस चौकी शेजारील सुरेश बापू प्लाझा इमारतीतील शैलेश सुंदरम हे ७ नंबर या फ्लॅटमध्ये राहतात. रात्री १० वाजेच्या सुमारास बाहेरून एक फटाक्याचे रॉकेट गॅलरीत आत आल्याने पेट घेतला. यात गॅलरीत ठेवण्यात आलेल्या साड्या, लॅपटॉप तसेच सोफा, पलंग व गाद्या जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर घटनेची माहिती नागरिकांनी सातपूर अग्निशामन दलाला दिली.

    अग्निशामक दलाचे कर्मचारी पी. बी. परदेशी, एस. आर. जाधव, ए. पी. मोरे उन्हाळे सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या अथक परिश्रमनंतर आग आटोक्यात आणली. तर इमारतीमधील नागरिकांनी घटनेची माहिती सुंदरम यांना दिली. तसेच इमारतीतील नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील वस्तू बाहेर काढल्याने होणारे नुकसान वाचवले.