मावळ तालुक्यात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

सलग आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून स्थानिक नागरिकांना याचा काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी १५  ऑगस्ट  स्वातंत्र्यदिन  असून सर्व  क्षेत्राला सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 

    तळेगाव दाभाडे : सलग आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे मावळ तालुक्यात पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून स्थानिक नागरिकांना याचा काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी १५  ऑगस्ट  स्वातंत्र्यदिन  असून सर्व  क्षेत्राला सार्वजनिक सुट्ट्या आहेत.  त्या सुट्टीला जोडून शनिवार, रविवार, सोमवार  अशा  सुट्ट्या आल्या. तसेच मंगळवारी पारशी  नववर्षदिनाचीही सुट्टी  आली आहे. त्यामुळे  सर्वांना सलग चार  सुट्ट्या  मिळाल्याने बहुतेक पर्यटक हे आपल्या मित्र परिवाराबरोबर सुट्टीचा आनंद  घेण्यासाठी पर्यटन स्थळाकडे वळलेले आहेत.

    मावळ तालुका हा पर्यटन स्थळे,  गडकिल्ले,  डोंगरदऱ्या,  लेण्या, गुहा, धार्मिकस्थळे व  निसर्गसौदर्याने  नटलेला  तालुका  असल्याने  पर्यटक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी प्रमाणे यावषीर्ही दाखल झालेले आहेत. बहुतेक  पर्यटक  आपापल्या  वाहनांनी आल्याने  तालुक्यातील  काही  महत्वाच्या  मुख्य  रस्त्यावर प्रचंड  वर्दळ वाढल्याने  वाहतूक  कोंडीचा मोठा प्रश्न  निर्माण होत आहे. त्यामुळे  पोलीस यंत्रणेवर  त्याचा प्रचंड ताण आला आहे.

    सर्वाधिक  पर्यटक  लोणावळा-खंडाळा परिसरात  दाखल  झाले आहे.  याशिवाय  कार्ला, भाजेलेणी, लोहगड, विसापूर, तुग, तिकोणा या किल्ल्यावर पर्यटक आलेले  होते. पवना धरण  परिसरातही पर्यटकानी मोठी  गर्दी  केली होती. पवना  परिसरात  पर्यटक जास्त संख्येने  आल्याने  लोणावळा-पवनानगर या रस्त्यावर  वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. तर पुणे  बाजूकडुन येणाऱ्या  पर्यटकामुळे  सोमाटणे फाटा ते पवनानगर   कामशेट  ते पवनानगर  अशीही पर्यटकांची मोठी  गर्दी झाली होती. कामशेट ते उकसान  आदर मावळातील  टाकवे,  वडेश्वर, वहानगाव  खांडी,  सावळा  या ठिकाणीही पर्यटक मोठ्या प्रमाणावर  जमले होते.

    या सर्व मार्गावरील  उपहारगृह  खाद्याच्या  टपऱ्या,  चहा, वडापाव,  मक्याची कणसे, शेंगा यांच्या दुकानाला अच्छे दिन आले होते.  तर महामार्गावरील हाटेल  -धाबे  येथे प्रचंड  गर्दीने वेढलेले होते.