
सोळा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला दोषी ठरवून पोक्सोच्या विशेष न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहितकुमार कृष्णा वर्मा (वय 31 रा. रुआतला, राजनांदगाव) असे दोषीचे नाव आहे.
नागपूर : सोळा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला दोषी ठरवून पोक्सोच्या विशेष न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रोहितकुमार कृष्णा वर्मा (वय 31 रा. रुआतला, राजनांदगाव) असे दोषीचे नाव आहे. वाठोडा पोलिसांनी (Vathoda Police) पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रोहितकुमारविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
रोहित मजुरी करण्यासाठी नागपूरला आला होता. येथे तो भाड्याने खोली करून राहत होता. या दरम्यान त्याने परिसरात राहणाऱ्या पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडिता गर्भवती झाली. प्रकृती बिघडल्याने आई तिला उपचारार्थ रुग्णलयात घेऊन गेली असता गर्भवती असल्याचे उघडकीस आले. आईने विचारपूस केली असता संपूर्ण घटना पुढे आली.
दरम्यान, पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो ऍक्टच्या विविध कलमान्वये रोहित विरुद्ध गुन्हा नोंदविला. जवळपास 10 दिवस शोध घेऊन रोहितला अटक करण्यात आली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज सहारे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.