संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

घरगुती वादाच्या कारणावरुन (Minor Reason) पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना शहरातील विंचूर चौफुली येथे घडली. दरम्यान, संशयित पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    येवला : घरगुती वादाच्या कारणावरुन (Minor Reason) पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना शहरातील विंचूर चौफुली येथे घडली. दरम्यान, संशयित पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    येवला शहरातील विंचरू चौफुली या वर्दळीच्या ठिकाणी अरुण रतन दाभाडे (वय ३०, रा. कोपरगाव टाकळी) आणि त्याची पत्नी पूजा अरुण दाभाडे (२६, हल्ली रा. महात्मा फुले कॉलनी, येवला) यांच्यात वाद झाला. या वादात मंगळवारी संशयिताने कोयत्याने पत्नीवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या महिलेला येथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल केले. अधिक उपचारार्थ महिलेस शिर्डी येथे हलविण्यात आले.

    घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे, सूरज मेढे, पोलीस कॉन्स्टेबल पवार, गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपीस ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी येवला शहर पोलिसात रात्री पतीस पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.