
गेल्या काही दिवसांपूर्वी काहींनी वनरक्षक भरतीचा (Forest Gaurd) पेपर दहा लाख रुपयांत फोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी काहींनी वनरक्षक भरतीचा (Forest Gaurd) पेपर दहा लाख रुपयांत फोडल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. वनरक्षक पदाच्या भरती परीक्षेत कानात ब्लूटुथ घालून आलेल्या उमेदवाराला अटक करण्यात आली.
सतीश सिंग मदनसिंग जारवाल असे उमेदवाराचे नाव आहे. वनरक्षक पदासाठीची भरती परीक्षा सुरु होती. याच परीक्षेत सतीश हा एक्सलांस कम्प्युटर या परीक्षा केंद्रातून परीक्षा देण्यासाठी आला. जेव्हा तो परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याच्या कानात ब्ल्यूटूथ असल्याचे झडतीत आढळले.
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.