suicide

मुंबईतील अंधेरी परिसरात कुटुंबातील भांडणातून एका व्यक्तीने सार्वजनिक शौचालयात जाऊन आत्महत्या केली. त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  मुंबई : कौटुंबिक कलहातून आत्महत्या करण्याच्या घटना यापुर्वीही घडल्या आहेत. मात्र,  मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने चक्क परिसरातील सार्वजनिक शौचालयात गळफास लावून आत्महत्या (suicide in public toilet) केल्याची घटना उघडकीस आली आहे.  अंधेरीतील परिसरात ही घटना घडली आहे.

  नेमका प्रकार काय?

  मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या कुटुंबीयांशी भांडण झाले होते, त्याने रागाच्या भरात सार्वजनिक शौचालय घाठले आणितेथे पोहोचल्यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.

  या आधीही घडल्या आत्महत्येच्या घटना

  अलीकडे क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.  याआधी जुलै महिन्यात मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती कारमधून वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात होती. गाडी पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने गाडी थांबवली आणि थेट समुद्रात उडी घेतली.

  तसेच, जुलै महिन्यातच महाराष्ट्रातील नागपुरात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. वडिलांनी त्याच्याशी बोलणे बंद केल्याने एका 14 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केली.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एका 14 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली होती. मुलाच्या वडिलांनी त्याला अभ्यासात रस नसल्याने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. ही बाब मुलाला असह्य झाल्याने वडील काही कामानिमित्त बाहेर गेले असताना मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केली होती.

  पहिल्या मजल्यावरील खोलीत मुलाने टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे आणि ट्यूशन सोडल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्याशी बोलणे बंद केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले होते.