दारू पिण्यावरून पत्नीचा पतीशी वाद; पत्नीने हटकल्याने संतप्त झालेल्या पतीची गळफास लावून आत्महत्या

दारू पिण्यावरून पत्नीने हटकले होते. यामुळे झालेल्या वादानंतर एका 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या (Man Suicide) केली. ही घटना समुद्रपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामनगर परिसरात दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी घडली.

    समुद्रपूर : दारू पिण्यावरून पत्नीने हटकले होते. यामुळे झालेल्या वादानंतर एका 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या (Man Suicide) केली. ही घटना समुद्रपूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामनगर परिसरात दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी घडली.

    संजय लक्ष्मणराव येलगुंडे (वय 40, रा. रामनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लक्ष्मणराव येलगुंडे याला दारूचे व्यसन होते. नेहमीप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी संजय दारू पिऊन घरी आला. दारू पिण्याच्या कारणातून पत्नी सुषमा हिने संजय येलगुडे याला दारू पिण्याच्या कारणात हटकले असता त्याने तिच्यासोबत वाद घातला.

    दरम्यान, झालेल्या वादात आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. पत्नीला काळजी वाटल्याने तिने पतीला कॉल केला असता त्याने उचला नाही. त्यामुळे गावातील शंकर धोटे यांना संजय फोन उचलत नाही घरी जाऊन बघण्यास सांगितले. त्यावेळी घराच्या अंगणातील लाकडी बल्लीला दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.