पत्नीचे अपहरण करून खून; हत्या करून मृतदेह टाकला ऊसाच्या शेतात

दौंड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून तिचे अपहरण केले. नंतर तिची निर्घृणपणे हत्या (Woman Murder) करून मृतदेह शेजारील गावातील ऊसाच्या शेतात नेऊन टाकला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दौंड पोलिसांनी अवघ्या चार दिवसांतच या गुन्ह्याचा छडा लावला.

    पाटस : दौंड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून तिचे अपहरण केले. नंतर तिची निर्घृणपणे हत्या (Woman Murder) करून मृतदेह शेजारील गावातील ऊसाच्या शेतात नेऊन टाकला. याप्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दौंड पोलिसांनी अवघ्या चार दिवसांतच या गुन्ह्याचा छडा लावला.

    याप्रकरणी आरोपी पती संतोष अहिऱ्या पवार (वय 28, राहणार खडकी, ता. दौंड जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार याने त्याची पत्नी सुरेखा (वय 35) हिला 19 मे रोजी मारहाण करून तिचा खून करण्याचे उद्देशाने तिला पळवून नेले होते. याबाबत 20 मे रोजी सुरेखा हिची नातेवाईक चंदाबाई नाहीराज भोसले (रा. कानडी ता. आष्टी, जि. बीड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संतोष पवार याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात 20 मे रोजी अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणातच तपासाची सूत्र हलवली. संशयित आरोपी संतोष पवार याला ताब्यात घेऊन अटक केले. दौंड न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्याने या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याची पत्नी सुरेखा हिचा खून करून मृतदेह खडकीपासून काही अंतरावर असलेल्या लोणारवाडी गावच्या हद्दीत टाकून दिल्याची कबुली दिली.