मुलगा खोड्या काढतो, मोबाईल खेळतो म्हणून बापानेच विष देऊन संपवलं; कोल्ड्रिंक प्यायला दिलं अन्…

बापाने 14 वर्षीय लेकाचीच कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा खोड्या करायचा, मोबाईलवर खेळायचा याचा राग अनावर झाल्याने वडिलाने थेट मुलालाच संपविले.

    मुंबई : बापाने 14 वर्षीय लेकाचीच कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा खोड्या करायचा, मोबाईलवर खेळायचा याचा राग अनावर झाल्याने वडिलाने थेट मुलालाच संपविले. विजय बट्टू असे नराधम बापाचे तर विशाल असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी या प्रकरणात विजयला अटक केली आहे. आरोपी विजय याने त्याच्या पत्नीजवळ मुलाचा खून केल्याची कबुली दिली होती. यानंतर आईनेच पोलिसांत तक्रार देत या घटनेचा खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा शाळेत खूप मस्ती करायचा त्यामुळे सतत तक्रारी यायच्या. खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल फोन पाहणे, या कारणांमुळे संतापलेल्या वडिलांनीच हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

    आईच्या तक्रारीनंतर फुटले बिंग

    मुलगा विशाल हा 13 जानेवारीपासून घरातून बेपत्ता होता. शवविच्छेदन केल्यानंतर विशालच्या शरीरात सोडियम नायट्रेट नावाचे विष आढळून आले. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांना विशालचे वडिल विजय यांच्या जबाबत विसंगती आढळून आले. त्यामुळे त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी सुरुच ठेवली.