8 वर्षांच्या मुलासह पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

औंध परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याची खळबळजनक घटना घडली. आयटी इंजिनिअर (IT Engineer) असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या 8 वर्षांच्या लहान मुलासह पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : औंध परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Pune Crime) झाल्याची खळबळजनक घटना घडली. आयटी इंजिनिअर (IT Engineer) असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या 8 वर्षांच्या लहान मुलासह पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदिप्तो गांगुली (वय 44) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुप्दितो गांगुली हा एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरीस होता. त्याने पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची माहिती मिळाली असून, पत्नी आणि मुलाचे नाव अद्याप समोर आले नाही.

दरम्यान, मंगळवारी रात्री चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण आज हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.