पती-पत्नीमध्ये झाला क्षुल्लक वाद, पतीला आला प्रचंड संताप; रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून

पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणातून खटके उडत होते. त्याच कारणावरून रागाच्या भरात आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. ही घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदिया येथे मंगळवारी (दि.19) दुपारी घडली.

    गोंदिया : पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणातून खटके उडत होते. त्याच कारणावरून रागाच्या भरात आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. ही घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदिया येथे मंगळवारी (दि.19) दुपारी घडली.

    केवल सीताराम नेवरा (वय 38) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. छत्तीसगड राज्यातील उरई येथील गोपाल सुरदेव निर्मलकर (वय 65) यांची मुलगी आशा हिचे लग्न गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील टोया गोंदी येथील केवल सीताराम नेवरा याच्यासोबत झाले होते. केवल नेवरा हा पत्नी आशा सोबत नेहमी भांडण करत होता. त्यांचे हे भांडण नित्याचेच झाले होते.

    दरम्यान, 19 डिसेंबर रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात आरोपी केवल नेवरा याने त्याची पत्नी आशाचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला.