काम आटोपून घरी परतणाऱ्या वकील कारकूनावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

घरी जाणार्‍या वकील कारकूनास एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन दुचाकीला जोरदार (Solapur Accident) धडक दिली. या धडकेत 44 वर्षीय प्रविण भाऊराव गुंगे यांचा झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

    मंगळवेढा : घरी जाणार्‍या वकील कारकूनास एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन दुचाकीला जोरदार (Solapur Accident) धडक दिली. या धडकेत 44 वर्षीय प्रविण भाऊराव गुंगे यांचा झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

    प्रविण भाऊराव गुंगे (वय 44 रा.सांगोला रोड,मंगळवेढा) हे मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान शहरातून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी घाडगे मळ्याजवळ अज्ञात वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन अतिवेगाने चालवली. त्याचदरम्यान, त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रविण हे गंभीर जखमी झाले. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

    दरम्यान, प्रविण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद दत्तात्रय शामराव गुंगे यांनी दिल्यावर अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर रुग्णवाहिकेतून प्रविण गुंगे यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी उपचारापुर्वीच तो मयत झाल्याचे सांगितले.