उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून ज्येष्ठाची हत्या; अवघ्या 5 तासांत आरोपी अटकेत

तालुक्यातील बरखेड साधारण 60 ते 65 वयोगटातील व्यक्तीला घातक शस्त्राने मारहाण करून ठार मारल्याची घटना उघडकीस आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत संशयिताला अटक केली

    भडगाव : तालुक्यातील बरखेड साधारण 60 ते 65 वयोगटातील व्यक्तीला घातक शस्त्राने मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 5 तासांत संशयिताला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे. उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    भडगाव जवळील खदान येथे जाऊन मृताची ओळख पटवली. सुपडु नाना वेलसे (वय ६५, रा. पेठ भाग, भडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भडगाव शहरात माहिती घेतली असता सुपडु वेलसे हा कुणाल मराठे याच्यासोबत होता. पोलिस पथकाने त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने घडला प्रकार सांगितला.

    कुणालने सुपडु वेलसे याच्याकडून उसनवारीवर पैसे घेतले होते. काही पैसे सुपडू वेलसे याला परत केले. परंतु, तो वांरवार पैशांचा तगादा लावत होता. घरी येऊन घरच्या लोकांना गल्लीत मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करत होता, असे आरोपी कुणालने म्हटले.