घरातील मोलकरीणीचे अश्लील व्हिडिओ बनवायचा ‘तो’; महिलेला कळताच केलं असं काही…

मोलकरीण म्हणून घरी येणाऱ्या महिलेचे मॉर्फिंग करत अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका भोंदूबाबाला सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) बेड्या ठोकल्या आहे.

    सिन्नर : मोलकरीण म्हणून घरी येणाऱ्या महिलेचे मॉर्फिंग करत अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एका भोंदूबाबाला सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) बेड्या ठोकल्या आहे. राहुल रामदास घुले (२२, रा. संगमनेर) असे या भोंदूबाबाचे नाव असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    मूळचा संगमनेर येथील रहिवाशी असलेला राहुल रामदास घुले हा नायगाव रोड भागातील एका शिक्षकाच्या घरात भाड्याने वास्तव्यास होता. तेथून तो बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची लूट करत होता. त्याच्याकडे याच परिसरातील एक ४० वर्षांची महिला मोलकरीन म्हणून कामाला येत होती. या महिलेचा चेहरा मॉर्फिंग करत राहुल घुले याने तिचे अश्लिल व्हिडीओ आणि फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून हे व्हिडिओ त्यावर अपलोड केले. याशिवाय तिच्या नातलगांनाही पाठवले. ही बाब सदर महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर या भोंदूबाबाच्या विरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन २६ ऑक्टोबर रोजी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.

    भोंदूबाबा उर्फ राहुल घुले राहत असलेल्या नायगाव रोड भागातील रहिवाशी योगेश नाठे यांची दुचाकी त्याने पाच ते दहा मिनिटात जाऊन येतो म्हणून घेतली होती. महिना उलटूनही ही दुचाकी सापडली नव्हती त्यासंदर्भातही पोलिस तपास करत होते. पोलिस तपासात ही गाडी नागपूरला असल्याचे निष्पन्न झाले.

    दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वीच भोंदूबाबा सिन्नरमधून गायब होता. पोलिसांनी नागपूर, मुंबई, पुणे वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन ट्रॅक करत लोकेशन बदलत असल्याने पोलिसांच्या हाती येत नव्हता. रविवारी तो संगमनेरला आल्याची माहिती मिळताच हवालदार नवनाथ पवार, समाधन बोर्हाडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या.