जामठ्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; तरुणीला निर्जनस्थळी नेले अन्…

महाविद्यालयात जात असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला नराधमाने निर्जनस्थळावर बळजबरी (Crime in Nagpur) केली. मात्र, तरुणीने आधीच हिंमत दाखवून पुढील धोका ओळखला. तिने फोन करून बहिणीला माहिती दिली.

    नागपूर : महाविद्यालयात जात असलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला नराधमाने निर्जनस्थळावर बळजबरी (Crime in Nagpur) केली. मात्र, तरुणीने आधीच हिंमत दाखवून पुढील धोका ओळखला. तिने फोन करून बहिणीला माहिती दिली. वेळेत कर्मचारी मदतीला धावले आणि आरोपीने पळ काढला. अन्यथा विद्यार्थिनीचा जीवही जाण्याची शक्यता होती. ही खळबळजनक घटना जामठा परिसरात समोर आली.

    पीडित 19 वर्षीय विद्यार्थिनी जामठातील महाविद्यालयात शिकते. ती मूळची यवतमाळची असून वसतिगृहात राहते. बुधवारी ती गावाहून जामठा स्टेडियमजवळ उतरली. तेथून जवळच महाविद्यालय असल्याने ती पायी निघाली. तिने मुख्य रस्ता सोडून कच्चा मार्ग निवडला. 25 ते 30 वर्षे वयोगटातील आरोपीने पाठलाग सुरू केला. त्याच्या हातात एक कुऱ्हाडही होती. रस्त्याच्या घनदाट झुडूपे होती.

    पीडितेने धोका ओळखत बहिणीला फोन लावला. याच दरम्यान आरोपी जीवे मारण्याची धमकी देऊन तिला झुडपात घेऊन गेला. पीडिने तो बळजबरी करू लागला. फोन सुरूच असल्याने पीडितेच्या बहिणीनेही त्यांचा आवाज ऐकला. तिने तत्काळ महाविद्यालयाच्या क्रमांकावर फोन करून माहिती दिली. महाविद्यालयाचे कर्मचारी तेथे पोहोचले. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने आरोपी तेथून पसार झाला.

    दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हिंगणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना युद्धस्तरावर तपास करून आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले.