आधी पत्नीची हत्या, नंतर मुलीचा सांभाळ कोण करेल म्हणून तिलाही संपवलं; निर्दयी बापाच्या कृत्याने गावच हादरलं

पत्नीचा खून केल्यानंतर (Wife Murder) आता कारागृहात जावे लागणार म्हणून एका नराधम पित्याने लहान मुलीचाही खून केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. आरोपीने आधी पत्नीची हत्या केली.

    अकोला : पत्नीचा खून केल्यानंतर (Wife Murder) आता कारागृहात जावे लागणार म्हणून एका नराधम पित्याने लहान मुलीचाही खून केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. आरोपीने आधी पत्नीची हत्या केली. आपण तुरुंगात जाणार हे लक्ष ठेऊन नंतर मुलीचे काय होणार या विचारातून त्याने तिचीही हत्या केली.

    मनीष म्हात्रे असे या निर्दयी वडिलाचे नाव आहे. मनीष म्हात्रेने रागाच्या भरात पत्नी रेश्माची हत्या केली. पण नंतर आपण तुरुंगात गेल्यावर मुलीचे काय होणार यातून मुलगी माहीचाही झोपेतच कुऱ्हाडीने वार करुन खून केला. आधीपासूनच पती-पत्नीत कौटुंबिक वाद असल्याने ते विभक्त राहत होते. पती मनीषच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी माहेरहून मुलीसह त्याच्याकडे आली होती.

    दरम्यान, त्यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद इतके विकोपाला पोहोचले की त्याने पत्नीला ठार केले. त्यानंतर त्याने आपल्या मुलीचे कसे होईल? तिचा सांभाळ कोण करेल? या अविचाराने मुलीच्याही डोक्यात कुऱ्हाड घातली आणि तिचाही खून करुन तो पोलिस ठाण्यात पोहोचला.